या ‘गोदार्द’ नावाच्या आशयात कायम आधुनिक जगण्याच्या वावटळीत सापडलेल्या समकालीन युरोपियन आयुष्याचा समावेश असायचा...
गोदार्दने फार धीटपणे सिनेमा या कलाप्रकाराची मूलभूत पवित्रता नष्ट न करता खर्चाच्या रूढीबद्ध गोष्टींपासून कशी मुक्तता मिळवता येईल, यावर काम केलं. त्याचा जो काही परिणाम समोर आला, तो सिनेमे बनवण्याच्या मूलभूत गोष्टींत लावलेला ताजा शोध होता, असं आपण म्हणू शकतो. गोदार्दच्या बाबतीत रूढी किंवा प्रस्थापित संकेत यांना उलटंपालटं करणं, हे केवळ चूष किंवा देखावा नाहीय.......